Monday, January 14, 2008

महामानवाचे महापरिनिर्वाण

. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाल्यानंतर वर्षभराने चैत्यभूमीची उभारणी झाली. बौद्ध संस्कृतीनुसार या स्थळावर चैत्यस्तूप उभारण्यात आला. म्हणून त्या परिसराला चैत्यभूमी म्हणतात. दरवर्षी लाखो आंबेडकर अनुयायी या महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर जमतात. या महापरिनिर्वाणदिनाची तयारी कशी करण्यात आली आहे, त्याची माहिती देत आहेत जयंत होवाळ व राजेश चुरी

......

महामानवाचे महापरिनिर्वाण

सहा डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलिपूर रोड येथील निवासस्थानी निदावस्थेत बाबासाहेबांचे निधन झाले. दिल्लीहून त्यांचे पाथिर्व विमानातून रात्री सव्वा तीन वाजता मंुबईत आणण्यात आले. रात्री सांताक्रूझ विमानतळावर सुमारे पंचवीस हजारांचा जमाव जमला होता. त्यानंतर अॅम्ब्युलन्समधे त्यांचे पाथिर्व ठेवण्यात आले. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून अॅम्ब्युलन्समधे खास प्रकाशयोजना करण्यात आली होती. सांताक्रूझ ते दादर हे पाच मैलाचे अंतर पार करण्यासाठी तीन तास लागले होते. पाच वाजून पाच मिनिटांनी अॅम्ब्युलन्स राजगृहापाशी आली. तेथे रात्रभर साडेतीन लाख लोक वाट पाहात होते. धीरगंभीर वातावरणात बुद्धं शरणं गच्छामीचा घोष होत होता. प्रचंड गदीर्वर काबू मिळवणे पोलिसांना आणि समता सैनिक दलाच्या कार्यर्कत्यांना अशक्य झाले होते. सव्वापाच वाजता बाबासाहेबांचे पाथिर्व अॅम्ब्युलन्समधून उतरवण्यात आले.

तेव्हा जनसमुदायाच्या अश्रुंचा बांध फुटला. अर्ध्या तासानंतर लोकांना दर्शनाची मुभा देण्यात आली. सात डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजगृहापासून अंत्ययात्रा निघाली. सुमारे बारा लाख लोक त्यात सामील झाले होते. सायंकाळी सात वाजता दादर चौपाटीवर बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले त्यानंतर भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते बौद्ध धम्म दीक्षा विधी झाला.

........

1 comments:

Anonymous said...

इंटरनेटच्या जगात आंबेडकर, दलित यांच्याबद्दल मराठितुन लेखन उपलब्द नाहि. तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. बरेचशे मराठि फोरम आहेत, जीथे दलित वर्गाबद्दल, आंबेडकरांबद्दल लिहिल गेलं पाहिजे. www.manogat.com, http://mr.upakram.org, www.misalpav.com.

About Me

My Photo
STUDENT OF MUSIC I.E INDIAN CLASSICAL MUSIC AND BUDDHISM, TRYING TO CREAT BUDDHIST STUDY CENTER IN INDIA
 
Google